सिंधुदुर्गात करोनाचे आशादायक चित्र, करोनामुक्त अधिक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाविषयीचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे.

आज, १ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५५५ आणि एकूण ३५ हजार ७३९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज नवे ३७४ करोनाबाधित आढळले.

सध्या जिल्ह्यात ५ हजार २०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या ३ जणांसह ३७४ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६०, दोडामार्ग – १३, कणकवली – ६१, कुडाळ – ७९, मालवण – ६६, सावंतवाडी – ५४, वैभववाडी – ३, वेंगुर्ले – ३३, जिल्ह्याबाहेरील २. एकूण करोनाबाधितांची संख्या ४२ हजार ३ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ५४९, दोडामार्ग २०२, कणकवली ९१२, कुडाळ ११८४, मालवण ९३०, सावंतवाडी ६०९, वैभववाडी २३५, वेंगुर्ले ५६२, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १९. सक्रिय रुग्णांपैकी २४७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०६० झाली आहे. आज नोंद झालेल्या आणि आधी मरण पावले असले, तरी आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड २, कणकवली १, मालवण २, सावंतवाडी २, वैभववाडी १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १३८, दोडामार्ग – ३१, कणकवली – २१३, कुडाळ – १६०, मालवण – २१४, सावंतवाडी – १५०, वैभववाडी – ६७, वेंगुर्ले – ८१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply