गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष ७२ गाड्या

मुंबई : गणेशोत्सवाकरिता मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर विशेष ७२ गाड्या सोडल्या जाणार आहेत. येत्या ८ जुलैपासून या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

या गाड्यांचे वेळापत्रक असे – १) सीएसएमटी ते सावंतवाडी रोड – दैनिक स्पेशल (३६ फेऱ्या). गाडी क्र. ०१२२७ : ही गाडी दररोज ५ ते २२ सप्टेंबरदरम्यान दररोज सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल, तर दुपारी २.०० वाजता सावंतवाडीला पोहोचेल. गाडी क्र. ०१२२८ : ही परतीच्या प्रवासाची गाडी ५ ते २२ सप्टेंबरदरम्यान दररोज सावंतवाडीहून दुपारी २.४० वा सुटेल, सीएसएमटीला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबेल.

२) सीएसएमटी ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक (१० फेऱ्या). गाडी क्र. ०१२२९ :* ही गाडी ६ ते २० सप्टेंबरदरम्यान दर सोमवार आणि शुक्रवारी सीएसएमटीहून दुपारी १.१० वाजता सुटेल, तर रत्नागिरीला रात्री १०.३५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२३० : ही परतीची गाडी ६ ते २० सप्टेंबरदरम्यान रविवार आणि गुरुवारी धावणार आहे. ही गाडी रत्नागिरीहून रात्री ११.३० वाजता सुटेल, तर सीएसएमटीला सकाळी ८.२० वाजता पोहोचेल. गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड येथे थांबेल.

३) पनवेल ते सावंतवाडी रोड – त्रिसाप्ताहिक (१६ फेऱ्या). गाडी क्र. ०१२३१ : ही गाडी ७ ते २२ सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून तीनदा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असेल. ही गाडी पनवेलहून सकाळी ८.०० वाजता सुटून सावंतवाडीला रात्री ८.०० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात. ०१२३२ क्रमांकाची ही गाडी ७ ते २२ सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून तीनदा मंगळवार, बुधवार आणि शनिवारी सुटेल, तर सावंतवाडीहून रात्री ८.४५ वाजता सुटून दुसऱ् दिवशी सकाळी ७.१० वाजता पनवेलला पोहोचेल. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, नांदगाव रोड, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबेल.

४) पनवेल ते रत्नागिरी – द्विसाप्ताहिक (१० फेऱ्या). गाडी क्र.०१२३३ ही गाडी ९ ते २३ सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून दोनदा गुरुवार आणि रविवारी धावेल. पनवेलहून सकाळी ८.०० वाजता सुटून रत्नागिरीला दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२३४ : ही परतीची गाडी ६ ते २० सप्टेंबरदरम्यान आठवड्यातून दोनदा सोमवारी आणि शुक्रवारी असेल. ही गाडी रत्नागिरीहून रात्री ११.३० वाजता सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०० वाजता पोहोचेल. ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply