रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २३३ रुग्ण, २३८ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० जुलै) करोनाचे नवे २३३ रुग्ण आढळले, तर त्याहून पाच अधिक म्हणजे २३८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची टक्केवारी ९२.५५ झाली आहे.

आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – ११०, अँटिजेन – १२३ (एकूण २३३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६८ हजार ९५९ झाली आहे.

आज तीन हजार १८३ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले दोन हजार ६४०, तर लक्षणे असलेले ५४३ रुग्ण आहेत. एक हजार २१७ गृह विलगीकरणात आहेत. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ७२१, डीसीएचसीमधील ३१०, तर डीसीएचमध्ये १९३ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांपैकी २४९ जण ऑक्सिजनवर, १०४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या दोन हजार २९५ नमुन्यांपैकी दोन हजार १८५ अहवाल निगेटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या पाच हजार ५०९ पैकी पाच हजार ३८६ अहवाल निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ४५ हजार ९२९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज २३८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ६३ हजार ८२१ झाली आहे.

जिल्ह्यात आज ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९६९ झाली आहे. आजचा मृत्युदर २.८५ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ६५२, खेड १७७, गुहागर १४६, दापोली १७४, चिपळूण ३७७, संगमेश्वर १७८, लांजा १०२, राजापूर १२०, मंडणगड २९. इतर जिल्ह्यातील १३. दुबार मोजणी १. (एकूण १९६९).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply