सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६० नवे करोनाबाधित, ८८ करोनामुक्त, मृत्यूची नोंद नाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ जुलै) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १६० नवे करोनाबाधित आढळले, तर त्यापेक्षा निम्म्याहून अधिक म्हणजे ८८ रुग्ण करोनामुक्त झाले. विशेष म्हणजे आज करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

जिल्ह्यातील करोनामुक्तांची एकूण संख्या ४३ हजार ९३ झाली आहे.

आज जिल्ह्याबाहेर तपासणी केलेल्या २ जणांसह नवे १६० करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ४७ हजार २३१ झाली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात २ हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – १८, दोडामार्ग – ५, कणकवली – ३५, कुडाळ – ४१, मालवण – २८, सावंतवाडी – १५, वैभववाडी – ५, वेंगुर्ले – १०, जिल्ह्याबाहेरील ३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ३८५, दोडामार्ग ७५, कणकवली ५२९, कुडाळ ६९६, मालवण ४७८, सावंतवाडी ३७८, वैभववाडी १४८, वेंगुर्ले २०७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २१. सक्रिय रुग्णांपैकी १५२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २१० एवढी आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १५५, दोडामार्ग – ३५, कणकवली – २४८, कुडाळ – १८४, मालवण – २४६, सावंतवाडी – १६८, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ७.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply