रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुक्तांपेक्षा नवा एक करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (७ ऑगस्ट) २७९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर त्याहून एक कमी म्हणजे २७८ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६८ हजार ७२८ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.२४ झाली आहे. आज ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज आढळलेल्या नव्या २७९ करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या तीन हजार ८३४ नमुन्यांपैकी तीन हजार ६६२ अहवाल निगेटिव्ह, तर १७२ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ३६७ पैकी दोन हजार २६० अहवाल निगेटिव्ह, तर १०७ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून २७९ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७२ हजार ९२७ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ५३ हजार ३०० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज एक हजार ७६६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ३६९, तर लक्षणे असलेले ३९७ रुग्ण आहेत. ७८३ रुग्ण गृह विलगीकरणात, ९७३ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहे. सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ५७६, डीसीएचसीमधील १८०, तर डीसीएचमध्ये २१७ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १४५ जण ऑक्सिजनवर, ७० रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या २ आणि आजच्या ४ अशा एकूण ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील २.३२ हा मृत्युदर वाढून तो २.९३ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १३५ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ७८८ (८३.७५ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७६४ (३५.७८ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३१, दापोली १८४, खेड १८५, गुहागर १५४, चिपळूण ४०७, संगमेश्वर १८७, रत्नागिरी ७३१, लांजा ११५, राजापूर १४१. (एकूण २१३५).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply