सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सीईओ १८ ऑगस्टला करणार ऑनलाइन यूपीएससी मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : यूपीएससीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे बुधवार, १८ ऑगस्ट रोजी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या स्वरूपापासून विविध शंकांचे निरसन त्यात होणार आहे.

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या या संकल्पनेची सुरुवात यानिमित्ताने होत आहे. बुधवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हे मार्गदर्शन फेसबुक लाइव्हद्वारे होईल. त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक अशी –
https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-101061044850492

या अभिनव उपक्रमाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि सहायक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा सहभागी होणार आहेत.

यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, याविषयी माहिती दिली जाईल. तसेच विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे.

या उपक्रमात यापुढेही जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांना सहभागी करून घेऊन एमपीएससी परीक्षेबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्पर्धापरीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply