सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४७ हजार ३८४ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२२ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४७ हजार ३८४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १ हजार ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज दुबार तपासणी केलेल्या एकासह करोनाचे नवे ५५ रुग्ण आढळले. आज बरे झाल्याने घरी ११ जण घरी गेले.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५० हजार ३९५ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग २, कणकवली २५, कुडाळ ४, मालवण ६, सावंतवाडी ८, वैभववाडी ३, वेंगुर्ले २.

सक्रिय रुग्णांपैकी ७५ रुग्ण ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २१८, दोडामार्ग ४३, कणकवली ३११, कुडाळ ४३१, मालवण २४०, सावंतवाडी २३७, वैभववाडी ६७, वेंगुर्ले १२२, जिल्ह्याबाहेरील १५.

आज जिल्ह्यात मणचे (ता. देवगड) येथील एका करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय याआधी मरण पावलेल्या ४ रुग्णांची नोंदही आज झाली. त्यांचा तपशील असा – देवगड १, कणकवली १, कुडाळ १, मालवण १, वैभववाडी १. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार ३२५ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६६, दोडामार्ग – ३६, कणकवली – २७५, कुडाळ – २०८, मालवण – २६६, सावंतवाडी – १८२, वैभववाडी – ८०, वेंगुर्ले – १०३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply