पश्चिम रेल्वेवरील चाकरमान्यांसाठी आणखी दोन गणेशोत्सव स्पेशल

नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावरून अनेक गाड्या आतापर्यंत जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणखी दोन गाड्यांची घोषणा आज करण्यात आली.

वांद्रे-मडगाव-वांद्रे ही विशेष तिकीट दर असलेली पूर्णपणे आरक्षित गाडी मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून सुटेल. दुसऱ्या दिवशी, ८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ती मडगावला पोहोचेल. ही गाडी बोरिवली, वसई, पनवेल मार्गे रवाना होईल. गाडीला १८ डबे असतील. ही गाडी बुधवारी, ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता आपला परतीचा प्रवास करेल.

दुसरी विशेष गाडी उधना (गुजरात) ते मडगाव आणि परत या मार्गावर धावणार आहे. ही गाडीही विशेष तिकीट दराची आणि पूर्णपणे आरक्षित असेल. उधना येथून ही गाडी गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून २५ मिनिटांनी सुटेल. गुजरातमधील नवसारी, वलसाड, वापी, त्यानंतर पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई मार्गे ही गाडी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे पोहोचेल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरून मडगावकडे रवाना होईल. या गाडीला १५ डबे असतील. ही गाडी शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता परतीच्या प्रवासाला निघेल.

या गाड्यांचे आरक्षण रविवार, २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली आहे.

……………………..

कोकण रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेला तपशील पुढीलप्रमाणे :

It has been decided to run following additional Ganpati Special Trains in coordination with Western Railway to clear extra rush of passengers during Ganpati Festival 2021.

1) Train no. 09193 / 09194 Bandra (T) – Madgaon Jn. – Bandra (T) AC Special on Special Fare (Fully Reserved) :

Train no. 09193 Bandra (T) – Madgaon Jn. AC Special on Special Fare (Fully Reserved) will leave from Bandra (T) at 23:55 hrs on Tuesday, 07th September 2021. Train will reach Madgaon Jn. at 15:00 hrs on the next day.

Train no. 09194 Madgaon Jn. – Bandra (T) AC Special on Special Fare (Fully Reserved) will leave from Madgaon Jn. at 20:30 hrs on Wednesday, 08th September 2021. Train will reach Bandra (T) at 11:20 hrs on the next day.

Train will halt at Borivali, Vasai Road, Panvel, Roha, Mangaon, Khed, Chiplun, Sangameshwar Road, Ratnagiri, Rajapur Road, Vaibhavwadi Road, Kankavali, Sindhudurg, Kudal, Sawantwadi Road, Thivim and Karmali stations.

Composition : Total 18 Coaches = 03 Tier AC – 10 Coaches, Chair Car – 06 Coaches, Generator Car – 02.

2) Train no. 09195 / 09196 Udhna – Madgaon Jn. – Udhna Weekly Superfast Special on Special Fare (Fully Reserved) :

Train no. 09195 Udhna – Madgaon Jn. Weekly Superfast Special on Special Fare (Fully Reserved) will leave from Udhna at 15:25 hrs on Thursday, 09th September 2021. Train will reach Madgaon Jn. at 09:05 hrs on the next day.

Train no. 09196 Madgaon Jn. – Udhna Weekly Superfast Special on Special Fare (Fully Reserved) will leave from Madgaon Jn. at 11:30 hrs on Friday, 10th September 2021. Train will reach Udhna at 05:00 hrs on the next day.

Train will halt at Navsari, Valsad, Vapi, Palghar, Vasai Road, Panvel, Roha, Mangaon, Khed, Chiplun, Savarda, Sangameshwar Road, Ratnagiri, Rajapur Road, Vaibhavwadi Road, Kankavali, Sindhudurg, Kudal, Sawantwadi Road, Thivim and Karmali stations.

Composition : Total 15 LHB Coaches = 02 Tier AC – 01 Coach, 03 Tier AC – 04 Coaches, Sleeper – 06 Coaches, Second Seating – 02 Coaches, Generator Car – 02.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply