केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुन्हा सुरू

रत्नागिरी : ढोल-ताशांचा गजर करत आज (२७ ऑगस्ट) केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे भाजप कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत जंगी स्वागत केले. त्यानंतर श्री. राणे यांची दोन दिवसांपूर्वी संगमेश्वरात खंडित झालेली जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली.

रत्नागिरी शहरात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास श्री. राणे यांचे आगामन झाले त्यांच्यासोबत आमदार आशीष शेलार, सौ. नीलमताई राणे आदी उपस्थित आहेत. प्रचंड पोलिस बंदोबस्त आणि शेकडो भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यात्रा सुरू झाली. राणे यांना झालेली अटक, जामीन आणि दीड दिवस स्थगित केलेली यात्रा आज रत्नागिरीतून पुन्हा सुरू होत असल्यामुळे ते नेमके काय बोलणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. श्री. राणे यांच्या आगमनानंतर शहरात रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे.

मारुती मंदिर सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यांनतर श्री. राणे यांच्या दौऱ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर श्यामराव पेजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करून श्री. राणे यांनी गोळप येथे आंबा प्रक्रिया उद्योजक विजय देसाई यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत भाजप द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. देसाई यांच्या कारखान्याला भेट दिल्यानंतर तेथेच आंबा आणि काजू व्यावसायिकांशीही श्री. राणे यांनी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा नेते आशीष शेलार, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंबा काजू व्यावसायिक आदी उपस्थित होते.

स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे उल्हास परांजपे यांचे तंत्र. त्यांची पुस्तके ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी लिंक्स
‘चला पाणी साठवू या… अर्थात फेरोसिमेंटची किमया’ : shorturl.at/mrsM2
नैसर्गिक धागे-सिमेंट तंत्रज्ञानाने चला पाणी साठवू या!’ : shorturl.at/dFR37

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply