रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे १०६ रुग्ण, २६ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ४ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार २६ रुग्ण करोनामुक्त झाले, तर १०६ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७२ हजार ६६४ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी घटून ९५.२६ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या १०६ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १५८७ नमुन्यांपैकी १५२४ अहवाल निगेटिव्ह, तर ६३ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या १९८४ पैकी १९४१ अहवाल निगेटिव्ह, तर ४३ पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७६ हजार २८६ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ७६ हजार ७१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज १०६९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ७९५, तर लक्षणे असलेले २७४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५२० आहे, तर ५४९ जण संस्थात्मक विलगीकरणात असून २०१ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २७५, डीसीएचसीमधील १२३, तर डीसीएचमध्ये १५१ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ८५ जण ऑक्सिजनवर, ५४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एका आणि आधीच्या एका अशा एकूण २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.९५ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.०९ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३५२ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१०, खेड २१३, गुहागर १६६, चिपळूण ४५९, संगमेश्वर २०३, रत्नागिरी ७८६, लांजा १२४, राजापूर १५६. (एकूण २३५२).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply