रत्नागिरीत आज ५० जण करोनामुक्त; ६७ नवे रुग्ण


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १७ सप्टेंबर) जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार ५० रुग्ण करोनामुक्त झाले, तर ६७ नवे करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील करोनामुक्तांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७३ हजार ६४८ झाली असून, बरे होण्याची टक्केवारी किंचित घटून ती ९५.३४ झाली आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ६७ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ११७० नमुन्यांपैकी ११४३ अहवाल निगेटिव्ह, तर २७ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या २२४५ पैकी २२०५ अहवाल निगेटिव्ह, तर ४० पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७७ हजार २४६ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख १९ हजार ५७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज १०३७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ६५९, तर लक्षणे असलेले ३७८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ५८७ आहे, तर ४५० जण संस्थात्मक विलगीकरणात असून १७९ जणांची नोंद अजून पोर्टलवर झालेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ७२, डीसीएचसीमधील १९६, तर डीसीएचमध्ये १८२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६९ जण ऑक्सिजनवर, ३९ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.१३ टक्के होता. या आठवड्यात तो ३.०८ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.२९ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३८२ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३५, दापोली २१४, खेड २१७, गुहागर १६६, चिपळूण ४६८, संगमेश्वर २०६, रत्नागिरी ७९५, लांजा १२४, राजापूर १५७. (एकूण २३८२).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply