रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १ ऑक्टोबर) जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ७२ रुग्ण आढळले, तर ६५ रुग्ण करोनामुक्त झाले. आज तिघा रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ६४ झाली असून, ७४ हजार ९४१ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.०० आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ७२ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १३५७ पैकी १३२४ अहवाल निगेटिव्ह, तर ३३ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १४०३ नमुन्यांपैकी १३६४ अहवाल निगेटिव्ह, तर ३९ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ५९ हजार ९४७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज ६९७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ४४४, तर लक्षणे असलेले २५३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३९३ आहे, तर ३०५ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ५१, डीसीएचसीमधील १०३, तर डीसीएचमध्ये १५० रुग्ण आहेत. बाधितांपैकी ७१ जण ऑक्सिजनवर, ३४ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज तिघा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ५.२७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.४३ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४२६ झाली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२२, गुहागर १६८, चिपळूण ४७३, संगमेश्वर २१३, रत्नागिरी ८०८, लांजा १२५, राजापूर १६०. (एकूण २४२६).
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड