रत्नागिरीत ४७ नवे रुग्ण; ७७ जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ३ ऑक्टोबर) जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ४७ रुग्ण आढळले, तर ७७ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार १७० झाली असून, ७५ हजार ८८ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.०६ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ४७ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १३९१ पैकी १३८३ अहवाल निगेटिव्ह, तर ८ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या १२७० नमुन्यांपैकी १२३१ अहवाल निगेटिव्ह, तर ३९ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ६४ हजार १२० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ६५४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३८७, तर लक्षणे असलेले २६७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३४७ आहे, तर ३०७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४०, डीसीएचसीमधील ११८, तर डीसीएचमध्ये १४९ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ५८ जण ऑक्सिजनवर, ३५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ५.२७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.३१ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४२८ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२२, गुहागर १६८, चिपळूण ४७३, संगमेश्वर २१३, रत्नागिरी ८०८, लांजा १२६, राजापूर १६१. (एकूण २४२८).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply