hands with latex gloves holding a globe with a face mask

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ६१ रुग्ण, ८७ करोनामुक्त, पाच जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (८ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे नवे ६१ रुग्ण आढळले, तर ८७रुग्ण करोनामुक्त झाले. या काळात पाच रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या एकासह आज नवे ६१ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ४२८ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १, दोडामार्ग ८, कणकवली ९, कुडाळ १०, मालवण १८, सावंतवाडी ९, वैभववाडी ०, वेंगुर्ले ६. ही माहिती जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या ९१४ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ५३ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९०, दोडामार्ग ४४, कणकवली १५५, कुडाळ २१४, मालवण १५५, सावंतवाडी १३१, वैभववाडी २७, वेंगुर्ले ८४, जिल्ह्याबाहेरील १४.

आज पडवे, वसोली (कुडाळ), वराड, चिंदर (मालवण) आणि उसप (दोडामार्ग) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यात वसोली आणि वराड येथील रुग्ण महिला आहेत. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४२९ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७७, दोडामार्ग – ४२, कणकवली – २९५, कुडाळ – २३८, मालवण – २८४, सावंतवाडी – १९६, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply