कोणती घरघंटी खरेदी करावी? घरघंटीचे कार्य कसे चालते?

घरघंटीसंदर्भातील ग्राहकांकडून विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न :

घरगुती वापरासाठी किती ताकदीची घरघंटी खरेदी करावी?
सर्वसाधारणपणे एक एचपी (अश्वशक्ती) ची घरघंटी घ्यायला हरकत नाही. एक एचपी घरघंटी गृहीत धरून यापुढील प्रश्नांची उत्तरे देत आहे.

घरघंटीत किती किलो धान्य दळून होते?
एका वेळी चार ते पाच किलो क्षमता आणि एका तासात आठ ते दहा किलो दळण दळून होते.

प्रतिकिलो धान्य दळण्याचा विजेचा खर्च किती?
एक रुपयाहून कमी.
(घरघंटीचा सव्वा तास वापर झाल्यास अंदाजे एक युनिट, सव्वा तासात कमीत कमी दहा किलो धान्य दळले जाते. विजेच्या युनिटचा सध्याचा दर पाच रुपये आहे, असे गृहीत धरल्यास प्रतिकिलो एक रुपयाहून कमी खर्च येतो.)

घरघंटीवर दररोज किती धान्य दळता येईल?
सुमारे चाळीस किलो धान्य दळता येईल.

विद्युतदाब सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत योग्य असायची शक्यता असते. म्हणून या आठ तासांत अर्धा तास चालू आणि अर्धा तास बंद याप्रमाणे घरघंटी चालवावी.)

घरघंटी कोणत्या कंपनीची खरेदी करावी?
सध्या मार्केटमध्ये ब्रॅण्डेड- नॉनब्रॅण्डेड अशा अनेक घरघंटी उपलब्ध आहेत. पन्नास शंभर नावे आढळतील. त्यामुळे स्थानिक पातळीवरील जाणकार आणि विश्वासू दुकानातून घरघंटी खरेदी करावी, मग कंपनी कोणतीही असो.

घरघंटीची किंमत किती?
दर्जा व सेवा यातील तफावतीनुसार तसेच वैशिष्ट्ये आणि सोयी यातील फरकानुसार अगदी नऊसाडे नऊ हजारापासून एकवीस-बावीस हजार रुपयांपर्यंत किंमत असू शकते.

घरघंटीला कोणत्या देखभाल वा दुरुस्तीची गरज असते?
चाळण, कापड आणि ब्रश या वस्तू वापर होतील तशा वर्षभराने बदलाव्या लागू शकतात. पण त्या फार महाग नसतात. बाकी सर्व्हो म्हणजे धान्य सोडणारी छोटी मोटर, सर्किट किंवा ज्याला कंट्रोलर वा कार्ड म्हणतात आणि कोड वायर सेट या वस्तू विद्युतदाब योग्य असल्यास दोन, तीन अगदी पाच वर्षेही टिकतात. मुख्य मोटरचे वाइंडिंग (कॉपरचे असल्यास)(अॅल्युमिनिअमपेक्षा कॉपर नक्कीच चांगले) आणि घरघंटीचा एकूण वापर काळजीपूर्वक केल्यास शक्यतो परत परत करायला लागायची शक्यता कमी. रोटरदेखील (बहुतांश स्क्वायरल केज असल्याने) खराब होत नाही. बेअरिंग आणि कपॅसिटर कधीतरी बदलावा लागू शकतो. बीटर म्हणजे फिरणारे पाते (धान्यात खडा, स्क्रू, नाणे वा धातूचा किंवा कठीण तुकडा गेला नाही, तर) शक्यतो चांगले राहते. चेंबर म्हणजे जेथे धान्य दळले जाते ती जागा हा सगळ्यात टिकाऊ पार्ट असतो, शक्यतो आयर्न कास्टिंगचे असावे (अॅल्युमिनिअम कास्टिंगचे नसावे) . होपर म्हणजे जेथून धान्य सोडले जाते (ते स्टेनलेस स्टीलचे आणि गोलाकार असल्यास) अनेक वर्षे टिकते. घरघंटीची कॅबिनेट पार्टिकल बोर्डऐवजी मॉड्युलर डेन्सिटी फ्रेमची असणे जास्त चांगले.

घरघंटीचा वापर कसा करायचा?
सगळ्याच गोष्टी लिखित स्वरूपात देणे शक्य नाही. घरघंटी खरेदी केल्यावर/करताना प्रात्यक्षिक पाहणे योग्य ठरेल. तरीही सांगायचे झाले तर आवश्यक ती चाळण चेंबरमध्ये बसवून निवडलेले सुके धान्य होपरमध्ये टाकल्यास घरघंटी (स्वयंचलित असेल तरच) आपोआप सुरू होते आणि दळून झाल्यावर आपोआप बंद होते. काही घरघंटी संचांना ज्वारी, बाजरी दळण्यासाठी मोड हा नॉब अधिक चांगल्या प्रकारे दळण्यासाठी दिलेला असतो. प्रत्येक कंपनी, ब्रॅण्ड, मॉडेल यानुसार वापरायची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते. आपण आपल्या विक्रेत्याकडून प्रत्यक्ष समजून घेणे योग्य ठरेल.

©.. मनिष सोल्युशन्स, लांजा 416701
गृहोपयोगी वस्तूंचे दालन
प्रोप्रायटर – एस व्ही कुलकर्णी
(बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स)
संपर्क – 9970593910

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply