रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १० ऑक्टोबर) करोनाचे नवे ५५ रुग्ण आढळले, तर ५२ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ५५ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ४७९ झाली असून, ७५ हजार ४८८ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.१९ आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ५५ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १०३९ पैकी १००८ अहवाल निगेटिव्ह, तर ३१ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ८५४ नमुन्यांपैकी ८३० अहवाल निगेटिव्ह, तर २४ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ७८ हजार २९५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज ५५१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले २८६, तर लक्षणे असलेले २६५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २६४ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २८७ जण आहेत. आजही एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले २२, डीसीएचसीमधील १२९, तर डीसीएचमध्ये १३६ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६० जण ऑक्सिजनवर, २९ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.३७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४४० एवढीच आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२२, गुहागर १६८, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१४, रत्नागिरी ८१४, लांजा १२७, राजापूर १६२. (एकूण २४४०).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media