coronavirus

रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या घटून ३५९वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १२ ऑक्टोबर) करोनाचे नवे ३४ रुग्ण आढळले, तर १३७ रुग्ण करोनामुक्त झाले. आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३५९वर आली आहे. जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ३४ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ५२३ झाली असून, आतापर्यंत ७५ हजार ७१८ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.४३ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ३४ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ११३३ पैकी ११११ अहवाल निगेटिव्ह, तर २२ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ७३१ नमुन्यांपैकी ७१९ अहवाल निगेटिव्ह, तर १२ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ८१ हजार १९९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ३५९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले २३७, तर लक्षणे असलेले १२२ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २३० आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात १२९ जण आहेत. आजही एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ७, डीसीएचसीमधील ५८, तर डीसीएचमध्ये ६४ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ५८ जण ऑक्सिजनवर, २५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ४ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१२ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.५६ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४४६ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१९, खेड २२२, गुहागर १७१, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१५, रत्नागिरी ८१५, लांजा १२८, राजापूर १६२. (एकूण २४४६).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply