सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१२ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत ४३ रुग्ण करोनामुक्त झाले. नवे ५५ रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा मृत्यू नोंदविला गेला.
जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांच्या दुबार लॅब तपासणीसह आज नवे ५५ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ५८१ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग ४, कणकवली १०, कुडाळ १२, मालवण १२, सावंतवाडी ५, वैभववाडी १, वेंगुर्ले ४.
जिल्ह्यात सध्या ६२१ सक्रिय रुग्ण असून, सक्रिय रुग्णांपैकी ३९ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ५०, दोडामार्ग ३२, कणकवली ११४, कुडाळ १५८, मालवण ९९, सावंतवाडी ८९, वैभववाडी ६, वेंगुर्ले ६८, जिल्ह्याबाहेरील ५.
आज नेमळे (ता. सावंतवाडी) येथील ७० वर्षीय आणि आरोस (ता. सावंतवाडी) येथील ७५ वर्षीय अशा दोन स्त्रिया आणि आरवली (ता. वेंगुर्ला) येथील ७९ वर्षीय पुरुष अशा एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तिघांनाही सहव्याधी होत्या. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४३६ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७८, दोडामार्ग – ४२, कणकवली – २९६, कुडाळ – २३९, मालवण – २८५, सावंतवाडी – १९८, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १०७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड