गडकिल्ले संवर्धनवाढीसाठी लांज्यातील शिवगंध प्रतिष्ठानची किल्ले स्पर्धा

लांजा : ऐतिहासिक गड आणि किल्ल्यांच्या संवर्धनाची वाढ व्हावी, नव्या पिढीला त्याबाबतची गोडी निर्माण व्हावी, यासाठी येथील शिवगंध प्रतिष्ठान संस्थेने किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा लांजा तालुक्यापुरती मर्यादित आहे.

किल्ला स्वहस्तकौशल्यातून आणि पर्यावरणपूरक बनविलेला असावा. किल्ला वैयक्तिक किंवा गटाने सांघिक स्वरूपाने मंडळाच्या माध्यमातून बनविला तरी चालेल. ऑनलाइन लाइक आणि प्रत्यक्ष परीक्षणाअंती स्पर्धेचा निकाल जाहीर होईल. तयार केलेल्या किल्ल्याचे वर्णन करणारी माहिती सांगणे आवश्यक आहे. किल्ल्याचा सुस्पष्ट फोटो आणि एक ते दोन मिनिटांचा व्हिडीओ पाठवावा लागेल.

यशस्वी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ आणि विशेष सादरीकरणासह एकूण २५ हजार ५५५ रुपयांची बक्षिसे दिली जातील. स्पर्धेचे प्रवेश शुल्क १५० रुपये आहे.

व्हिडीओ तसेच प्रवेश शुल्क गुगल पे, फोन पेद्वारे 7875870276 या व्हॉटस अॅप क्रमांकावर पाठवावे. स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०२१ ही आहे. स्पर्धेचा निकाल शिवगंध प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनी २१ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात येईल. प्रवेश आणि इतर माहितीसाठी राजूदादा जाधव (8806635778), गुरुप्रसाद देसाई (9860104010), सुमित गुरव (7875870276), अजित गोसावी (8087918818), विशाल कांबळे (9975498866), मोहन तोडकरी (9405729718), अमेय कांबळे (8378845276) किंवा जयू सुर्वे (9834640875) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply