hands with latex gloves holding a globe with a face mask

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा नवा १ रुग्ण, ५ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२९ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार दुबार तपासणी केलेला एक नवा रुग्ण आढळला, तर ५ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात सध्या ५४ सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ५४ रुग्णांपैकी १२ रुग्ण ऑक्सिजनवर, तर ४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ७, दोडामार्ग १, कणकवली १४, कुडाळ १०, मालवण ९, सावंतवाडी ७, वैभववाडी ०, वेंगुर्ले ५, जिल्ह्याबाहेरील १.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५७ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९८, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply