रत्नागिरी : जिल्ह्यात आज (७ डिसेंबर) ८ नवे करोनाबाधित आढळले असून, पाच जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या कालच्या ३२वरून आज ३५वर आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे ८ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १०९ आहे. आज पाच रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५८५ एवढी आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८१ आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३०२ पैकी २९६, तर रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ४१९पैकी ४१७ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. अनुक्रमे ६ आणि २ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ४० हजार २९५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३५ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १८, तर लक्षणे असलेले १७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १८, तर संस्थात्मक विलगीकरणात १७ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ८, तर डीसीएचमध्ये ९ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ७ जण ऑक्सिजनवर असून, एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहे.
आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४८९ आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८९).
लसीकरणाची स्थिती
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. ६ डिसेंबर) करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ९२ सत्रे झाली. त्यात ३८०८ जणांनी पहिला, तर ८४८८ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण १२२९६ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ७२ हजार १०१ जणांचा पहिला, तर ५ लाख १७ हजार १५ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १४ लाख ८९ हजार ११६ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.