सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४२ सक्रिय करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (९ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार एकही नवा करोनाबाधित आढळला नाही, एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही आणि एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात सध्या ४२ सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या ४२ रुग्णांपैकी २ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग १, कणकवली ४, कुडाळ १२, मालवण १०, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले ५, जिल्ह्याबाहेरील ०.

गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५९ आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०४, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply