hand holding petri dish

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा एकही रुग्ण चिंताजनक नाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१० डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात रुग्णालयात दाखल असलेला एकही रुग्ण चिंताजनक अवस्थेत नाही.

जिल्ह्यात आज नवा केवळ एकच रुग्ण आढळला, तर जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेले २ रुग्ण जिल्ह्यातील आहेत. गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र त्याआधीच्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज १७ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार जिल्ह्यात सध्या २७ सक्रिय रुग्ण आहेत.

आज आढळलेल्या नव्या करोनाबाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ०, दोडामार्ग ०, कणकवली २, कुडाळ ०, मालवण १, सावंतवाडी ०, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०.

जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या २७ रुग्णांपैकी ३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग ०, कणकवली ३, कुडाळ ५, मालवण ७, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील ०.

आज एका रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६० झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०४, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply