सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१७ डिसेंबर) करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नसून, एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
आज (१७ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.
जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १९ असून, आतापर्यंत ५१ हजार ७३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २१९ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १४६३ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या सक्रिय असलेल्या १९ रुग्णांपैकी एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे. दोन रुग्ण चिंताजनक असल्याने व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ३, दोडामार्ग ०, कणकवली ६, कुडाळ १, मालवण २, सावंतवाडी ५, वैभववाडी ०, वेंगुर्ले २, जिल्ह्याबाहेरील ०.
आज एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६३ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – २९९, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
लसीकरणाची स्थिती
जिल्ह्यात वाढत्या करोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ लाख ६० हजार ९६६ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामध्ये एकूण ९८५५ हेल्थ वर्करनी पहिला डोस, तर ८१९१ जणांनी दुसरा डोस घेतला. ९९९१ फ्रंटलाइन वर्करनी पहिला डोस, तर ८९३४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० वर्षांवरील १ लाख ३५ हजार ६८६ व्यक्तींनी पहिला डोस तर ९९ हजार ३०२ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील १ लाख ६० हजार ८३० नागरिकांनी पहिला डोस तर १ लाख २० हजार १९१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील २ लाख ४४ हजार ६०४ जणांनी पहिला डोस, तर १ लाख ५८ हजार ९१९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ९ लाख ५६ हजार ५०३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात सध्या २० हजार ६०० डोस शिल्लक असून त्यापैकी ७४०० कोविशिल्ड आणि १३ हजार २०० कोवॅक्सीनचे डोस आहेत.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media