कोकण रेल्वेमार्गावर २ जानेवारीला मडगाव पनवेल मडगाव मार्गावर विशेष गाडी

नवी मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण आलेल्या पर्यटकांना पुन्हा मुंबईला जाता यावे आणि मुंबईला गेलेल्यांना पुन्हा कोकणात येता यावे यासाठी कोकण रेल्वे मार्गावर नव्या वर्षी दोन जानेवारी रोजी मडगाव-पनवेल-मडगाव मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.

01594/01593 क्रमांकाची ही गाडी मडगाव येथून रविवारी, २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी दहा वाजून २० मिनिटांनी रवाना होईल आणि रात्री नऊ वाजता पनवेल येथे पोहोचेल. पनवेल येथून त्याच रात्री दहा वाजता ही गाडी परतीच्या प्रवासासाठी निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून ४० मिनिटांनी मडगावला पोहोचेल. पनवेलला जाताना ही गाडी थिवी, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबणार आहे. पनवेलहून मडगावला जाताना ही गाडी आडवली, राजापूर, वैभववाडी, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि करमळी या आणखी काही स्थानकांवरही थांबणार आहे.

या गाडीला १७ डबे असतील. त्यापैकी १५ डबे शयनयानाचे असतील. मध्य रेल्वेच्या सहकार्याने धावणार असलेल्या या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply