person holding covid sign

रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या ५०० च्या वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १० जानेवारी) करोनाचे नवे ६४ रुग्ण आढळले, तर ८१ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या ५१४ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ८९१ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ८७७ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आणखी घटून ९६.२३ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५२९ पैकी ५१४ निगेटिव्ह, तर १५ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ४०८ पैकी ३५९ नमुने निगेटिव्ह, ४९ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ७१ हजार ६२९ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ५१४ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ४०४, तर लक्षणे असलेले ११० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४०४, तर संस्थात्मक विलगीकरणात ११० जण आहेत. आठ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ५६, तर डीसीएचमध्ये ५४ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण दाखल नाही.

आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९२ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४८०, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३०, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९१).

लसीकरणाची स्थिती

जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. 9 जानेवारी) झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रांत १७३ जणांनी पहिला, तर ५९ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण २३२ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील १० लाख ४७ हजार ३२९ जणांचा पहिला, तर ७ लाख २९ हजार १३५ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १७ लाख ७६ हजार ४६४ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply