woman in white face mask

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ६३ रुग्ण, ८९ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ४ फेब्रुवारी) करोनाचे नवे ६३ रुग्ण आढळले, तर ८९ रुग्ण करोनामुक्त झाले. आजही तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८४ हजार ६५ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ८० हजार ७७९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.०९ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५८० पैकी ५४८ निगेटिव्ह, तर ३२ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ७५४ पैकी ७२३ नमुने निगेटिव्ह, तर ३१ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ६ हजार ५०५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ७२८ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ५२२, तर लक्षणे असलेले २०६ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ४७४ असून, संस्थात्मक विलगीकरणात २५४ जण आहेत. एकूण ३६ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १०१, तर डीसीएचमध्ये १०५ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ४८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ११ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात ९ रुग्ण दाखल आहेत.

यापूर्वी चिपळूण तालुक्यात मरण पावलेल्या दोन, तर रत्नागिरी तालुक्यातील एका अशा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५२२ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर १.०४ टक्के होता. आज नोंदविले गेलेले मृत्यू यापूर्वीचे आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २३०, गुहागर १७९, चिपळूण ४९१, संगमेश्वर २२७, रत्नागिरी ८३६, लांजा १३२, राजापूर १६६. (एकूण २,५२२).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५८ सत्रे पार पडली. त्यात २६७ जणांनी लशीचा पहिला, तर १,७८८ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण २,०५५ जणांचे लसीकरण झाले. याशिवाय १५ ते १७ वयोगटातील ४९५, तर ४७० जणांनी बूस्टर डोस घेतले. ३ जानेवारीपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ४८ हजार ६४१ जणांचा पहिला, तर ८ लाख २५ हजार ८२० जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १८ लाख ७४ हजार ४६१ जणांचे लसीकरण झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply