रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा नवा रुग्ण नाही; लसीकरणाला चांगला प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा काल (दि. २३ मार्च २०२२) करोनामुक्त झाला आहे. आज (२४ मार्च) झालेल्या तपासणीतही एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू असून, १२ ते १४ वयोगटाच्या लसीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४६६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९३२ म्हणजे ९७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज (२४ मार्च) झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेले सर्व ७४ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले सर्व २१७ असे २९१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ३४ हजार ५४७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही करोनाबाधित रुग्ण नाही. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही

जिल्ह्यात कोरोनामुळे २५३४ जणांचा बळी गेला. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २,५३४).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात २३ मार्च रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ५९ सत्रे पार पडली. त्यात ३३४२ नागरिकांनी लशीचा पहिला, तर ६८१ जणांनी दुसरा डोस घेतला. शिवाय ६५ जणांनी बूस्टर डोस घेतला. १२ ते १४ वयोगटातल्या ३१६५ जणांना २३ मार्च रोजी पहिला डोस देण्यात आला. एकूण ४०८८ जणांचे लसीकरण २३ मार्च रोजी झाले. २३ मार्चपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १८ वर्षांवरच्या १० लाख ५३ हजार ९४५ जणांचा पहिला, तर ८ लाख ८० हजार ४४१ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख ४४ हजार ६९८ जणांचे लसीकरण झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply