चिपळूण : मुंबईतील मराठा मंदिर संस्थेचा २०१९ सालचा आत्मचरित्र या साहित्य प्रकारातील प्रथम पुरस्कार जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या ‘झेप’ या आत्मचरित्रास प्रदान करण्यात आला.
साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत विविध साहित्य प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी मराठा मंदिर संस्थेतर्फे वाङ्मय पुरस्कार दिले जातात. करोना आणि इतर कारणांमुळे या पुरस्काराचे वितरण लांबणीवर पडले होते. पुरस्काराचे वितरण चिपळूण येथे मराठा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. यशवंत कदम आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. तानाजीराव चोरगे यांनी कथा, कादंबर्या, नाटक, संकीर्ण, बॅकिंग आणि व्यवस्थापन, आत्मचरित्र अशा अनेक साहित्य प्रकारात विविधांगी लेखन केले आहे. त्यांची ४५ पुस्तके प्रकाशित आहेत. झेप हे ८५० पेक्षा अधिक पृष्ठसंख्या असलेले त्यांचे प्रदीर्घ आत्मचरित्र आहे.
यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष सुनील खेडेकर, नामवंत कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, प्रकाश घायाळकर, मनीषा दामले, संजय शिंदे, जिल्हा बँकेचे अधिकारी वसंत सावंत, अजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड