जखमी झालेल्या बांधकाम कामगाराला संघटनेचे अर्थसाह्य

रत्नागिरी : बांधकाम करताना पायात सळई घुसल्याने जखमी झालेल्या सिद्रामय्या शिवय्या मठ (रवींद्रनगर, कुवारबाव, रत्नागिरी) या कामगाराला नव्याने स्थापन झालेल्या बांधकाम कामगार सहाय्यक संघातर्फे तातडीने अर्थसाह्य करण्यात आले.

महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र असलेल्या या संघटनेचे उद्घाटन गेल्या मार्चमध्ये झाले. उदघाट्न सोहळ्याला बांधकाम क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. ही संघटना जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, आर्थिक योजना आणि शासकीय योजना उपलब्ध करून देण्याकरिता कार्य करत आहे. त्यामुळे अनेक बांधकाम कामगारांनी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आहे. त्यांना विविध योजनांचा लाभ होत आहे. सिद्रामय्या मठ हा कामगारही संस्थेचा सभासद आहे. सिद्रामय्या एका इमारतीच्या बांधकामात काम करत असताना त्याच्या पायात लोखंडी सळई घुसली. मोठी दुखापत झाली. त्याला तातडीने दवाखान्यात हलवून उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच बांधकाम कामगार सहाय्यक संघाचे अध्यक्ष महादेव कोरे, उपाध्यक्ष नारायण खोराटे, सचिव सुयोग वांदरकर, उपसचिव अशोक खेत्री, सदस्य निलकंठ ककेरकर आणि चंद्रकांत बेकवाडकर यांनी तातडीने सिद्रामय्याची भेट घेऊन त्याला आर्थिक सहाय्य केले.

बांधकाम कामगारांना कोणतीच सुरक्षा नसते. त्यांना आर्थिक तसेच वैद्यकीय मदत करण्याचे काम बांधकाम कामगार सहाय्यक संघ करत आहे. त्याकरिता बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार सहाय्यक संघाचे सभासदत्व घेऊन नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष महादेव कोरे (94229 76861), उपाध्यक्ष नारायण खोराटे (7559126699) किंवा सचिव सुयोग वांदरकर (8793937877, 8007577877) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संघटनेचे कार्यालय कारवांची वाडी येथील आदर्श वसाहतीत माऊली अपार्टमेंटमध्ये गाळा क्र. ६ येथे आहे. तेथेही संपर्क साधता येईल, असे सूचित करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply