एकसष्टावी राज्य नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून

रत्नागिरी : राज्य शासनाची एकसष्टावी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून त्या तारखेपासून मालवणला, तर ३० नोव्हेंबरपासून रत्नागिरीत स्पर्धा सुरू होणार आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १५ नोव्हेंबरपासून राज्यभरात सुरुवात होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक फेरीदेखील १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून त्या दिवसापासून २९ नोव्हेंबरपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धेतील नाट्यप्रयोग मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात सादर होणार आहेत. तेथे १५ संघांनी सहभाग घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धा रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत होईल. रत्नागिरी केंद्राकरिता ११ नाट्यसंस्थांनी प्रवेशिका सादर केली आहे.

रसिक प्रेक्षकांनी या नाट्य स्पर्धेचा आस्वाद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी केंद्राचे समन्वयक नंदू जुवेकर (8329221797) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply