कार्ला येथे २६ नोव्हेंबरला `एक दिवस कायस्थांचा’

मुंबई : कार्ला (जि. पुणे) येथील एकवीरा गडावर यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा अनोखा संगम होणार आहे. `एक दिवस कायस्थांचा’ हा उपक्रम त्यादिवशी राबविण्यात येणार असून देशभरतील हजारो कायस्थ एकवीरा गडावर जमणार आहेत.

सीकेपी समाजाने `एक दिवस कायस्थांचा’ निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवाय ज्ञातीतील नामवंतांचाही गौरव केला जाणार आहे. या गौरव सोहळ्यासाठी विशेष पाहुणे निमंत्रित करण्यात आले आहेत. शनिवारी (दि. २६ नोव्हेंबर) पहाटे देवीचा अभिषेक, पालखी, होमहवन, गोंधळ, भक्तीसंगीत, समाजातील अकरा नामवंतांना पुरस्कार, महाआरती इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम गडाच्या पायथ्याशी होणार आहेत. दादर, पुणे, बोरीवली, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आदी भागातून विशेष बसेसद्वारे अनेक भक्त एकवीरा गडावर येणार आहेत.

या समोराहात डॉ. विजयकुमार डोंगरे (पद्मश्री),) निखिल चिटणीस (एअर मार्शल), प्राजक्ता रणदिवे (न्यायमूर्ती), आरती देशपांडे (उद्योजिका), शैलाताई फासे-मथुरे (उद्योजिका, समाजसेविका), दीपक देशपांडे (अतिरिक्त आयुक्त, आयकर), संजयराज गौरीनंदन (गायक-संगीतकार), नीलेश वैद्य (संचालक, अपना बाजार), डॉ. राजेश गुप्ते (वैद्यकीय सेवा), दिलीप गडकरी (साहित्यिक-समाज कार्यकर्ते), हेमभूषण कुळकर्णी (चांद्रसेनीय कायस्थ प्रभु गौरव गाथेचे संकलक), जयदीप कोरडे (तरुण, तडफदार समाज कार्यकर्ते), सुबोध देशपांडे (टेबल टेनिसपटू) यांचा गौरव विशेष पाहुण्यांच्या हस्ते केला जाणार आहे.

या समारंभास सीकेपी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तुषार राजे, राजेश देशपांडे, रघुवीर देशमुख इत्यादींनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिव मेघन गुप्ते (७०२१३२०१७८) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply