
एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा – रत्नागिरी केंद्र
आजचे नाटक (६ डिसेंबर २०२२) : मड वॉक
सादरकर्ते : सहयोग, रत्नागिरी
सोमवारी, ५ डिसेंबर रोजी संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच ही संस्था एक्स्ट्रीम हे नाटक सादर करणार होती. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे तो प्रयोग रद्द झाला. आज सहयोग (रत्नागिरी) संस्था मड वॉक हे नाटक सादर करणार आहे. श्रीपाद देशपांडे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन गणेश राऊत यांनी केले आहे.
स्पर्धेच्या युगात माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. धर्म आणि जात यात अडकत चाललेली पिढी तसेच त्याचा चुकीचा चाललेला प्रसार आणि माणसामाणसामधील वाढलेले अंतर, विध्वंसाकडे चाललेली मानवी वृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे. माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे, याची जाणीव करून देणारे हे नाटक आहे.
श्रेयनामावली
प्रकाशयोजना – चंद्रशेखर वसंत मुळे
नेपथ्य – विनायक (जॉनी) चंद्रकांत आपकरे, अप्पा रणभिसे
पार्श्वसंगीत – निखिल संतोष भुते
रंगभूषा – ओंकार प्रदीप पेडणेकर
वेशभूषा – तन्वी शिंदे, स्वप्नील धनावडे
पात्रपरिचय
दुर्गा – आर्या वंडकर
बब्बू – शुभम गोविलकर
रघू – अजिंक्य केसरकर
डॉ. रघुवीर – हेमंत चक्रदेव
बेंजामिन फ्रँकलीन – दीपक माणगावकर
कीर्तनकार – मयूरेश पाडावे
अध्यक्ष १ – स्वप्नील धनावडे
अध्यक्ष २- किरण राठोड
रघुची आई – प्रिया वाडकर-साटविलकर
अन्य कलावंत –
साक्षी कोतवडेकर, सुयोग बेंडल, साई जिरोळे, बबलू शर्मा, ईशा फाटक, मुक्ता शेंबेकर, मानीष भिडे, सौरभ मंडल, तुषार गिरकर, गिरीश तेंडुलकर, पार्थ देवळेकर, दीपेन भोजे, नकुल नाडकर्णी, ऋषिकेश कोकजे, रजत भरणकर, तन्वी शिंदे.
…………………

असे होते कालचे नाटक
काल (दि. ३ डिसेंबर) मावळतीचे इंद्रधनू हे नाटक संकल्प कलामंच (रत्नागिरी) या संस्थेने सादर केले. वृद्धावस्थेतून निर्माण झालेल्या समस्येवर हे नाटक आधारित आहे. धकाधकीच्या जीवनात समृद्धी आली असली, तरी त्यातून सारे काही साध्य होतेच, असे नाही. सारे काही विकत घेता येते, पण भावनांचे काय, हा प्रश्न राहतो. तरुण पतीपत्नी आपल्या व्यापात व्यस्त असतात. घरातील वृद्ध आईवडिलांसाठी सर्व भौतिक सुविधा ते उपलब्ध करून देतात. त्यातील वृद्ध स्त्रीचे निधन होते. वृद्ध पती म्हणजे कृष्णकांत मागे राहतो. त्याल सर्व सुविधा मिंळतात. पण त्याच्याशी बोलणारा, संवाद साधणारा माणूस त्याला हवा असतो. नव्या पिढीकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे रिकामा वेळ वृद्ध व्यक्तीला खायला उठतो. तो त्याच्याशी संवादा साधणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असतो. त्याच दरम्यान त्याची जुन्या मैत्रिणीशी भेट होते. तिचा मुलगा परदेशात स्थायिक असतो. वडिलांच्या निधनानंतर तो आईकडे येतो आणि तिच्याशी गोड बोलून आपल्याबरोबर येण्याची गळ तिला घालतो. आईलाही ते खरे वाटते. ती मुलाबरोबर जायला तयार होते. त्यामुळे मुलगा जमीनजागेसह सर्व मालमत्ता विकून टाकतो. आईला घेऊन विमानतळावर पोहोचतो, पण तिला विमानतळावरच सोडून तिला फसवून तो परदेशात निघून जातो. मुलाने आपली फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात येते. पण उशीर झालेला असतो. ती भटकत असते. त्याच दरम्यान कृष्णकांतशी तिची भेट होते. तो तिला म्हणजे वत्सलाला घरी घेऊन जातो. तिच्या रूपात तो साथीदार शोधतो. आपल्या उर्वरित जीवनाचा साथीदार म्हणून तो तिच्याकडे पाहत असतो. ती दोघे विवाहबद्धही होतात. पण त्याच्या मुलाला ते पसंत नसते. अखेर सुनेच्या आग्रहावरून त्याचे मतपरिवर्तन होते आणि शेवट गोड होतो.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निर्माण होत असलेल्या समस्य़ेवरचे हे सुखान्त नाटक आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा स्पर्धेतील सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. एकूण ४ हजार ७५ रुपयांची तिकीटविक्री झाली. तिकीट प्रत्येकी १० आणि १५ रुपयांचे आहे.
श्रेयनामावली
निर्मिती प्रमुख – विनोद वायंगणकर, गजानन गुरव, गणेश गुळवणी, डॉ. दिलीप पाखरे
पार्श्वसंगीत – योगेश मांडवकर
नेपथ्य – नंदकुमार भारती, उपरकर सर
प्रकाशयोजना – विनायकराज उपरकर
रंगभूषा – प्रकाश ठीक, गोविंद ठीक
वेशभूषा – सोनम साळुंखे, आर्या शेट्ये
रंगमंच व्यवस्था – सागर वायंगणकर, शशिकांत गुरव, सानिका देसाई़
पात्रपरिचय
कृष्णकांत – कृष्णकांत साळवी
वत्सला – रक्षिता पालव
प्रशांत – धनंजय कासेकर
प्रणाली – अनुजा जोशी
थोरात काकू – शलाका संतोष देसाई
दामू – सुयोग बारगोडे
आण्णा – विनोद वायंगणकर
शिवलकर – सत्यविजय शिवलकर
नगरकर – आशीष पाटील
मुकादम – अमोल गोसावी
कळा ज्या लागल्या जीवा नाटकातील काही क्षणचित्रे
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड