समाजव्यवस्था बिघडवणाऱ्यांना घडविलेली अद्दल

एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धा – रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (९ डिसेंबर २०२२) : मेलो, डोळो मारून गेलो

सादरकर्ते : कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, कोतवडे, ता. रत्नागिरी

सुप्रसिद्ध नाटककार वस्त्रहरण फेम गंगाराम गवाणकर यांनी मेलो डोळो मारून गेलो हे नाटक लिहिले आहे. वस्त्रहरण नाटकाचे समीकरणच या नाटकात आहे. लोकशाही व्यवस्थेचा गैरवापर करून समाजव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांना लोकशाही कशी अद्दल घडवते आणि लोकशाही पुर्स्थापित होऊन समाजव्यवस्थेचा कसा विजय होतो, हे या नाटकात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

एका खेड्यातील एक भोळाभाबडा नाम्या देवळातल्या पुजारी सीताराम गुरवाच्या देखण्या बायकोच्या प्रेमात पडतो. याच गोष्टीचा फायदा राजकीय समीकरण बदलणारा सणकीदास बाबा घेतो. अनिष्ट गोष्ट लोकशाही मार्गाने किती योग्य आहेत, हे पटवण्याचा आटापिटा करतो. राजकारणात किती उलट्या काळजाची माणसे असतात आणि लोकशाहीची कशी विटंबना करतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सणकीदास बाबा. नाटकाला थोडेसे राजकीय वळण आणि गंभीर स्वरूप असले तरी याला गवाणकरी पद्धतीने विनोदाची झालर आहे.

श्रेयनामावली
लेखक – गंगाराम गवाणकर
दिग्दर्शक – प्रसाद धोपट
पार्श्वसंगीत – अविनाश गावणकर
नेपथ्य – प्रवीण धुमक
प्रकाशयोजना – प्रतीक मेस्त्री
रंगभूषा – सचिन कुंभार
वेशभूषा – गार्गी सावंत, अमिषा देसाई
नृत्य – वृषाली पोळ

पात्रपरिचय

सावित्री – गार्गी सावंत
नाम्या – राहुल कासले
चंद्या – मनीष वरवडेकर
मावशी – दीपा माळकर
भाग्या – प्रतीक राजेशिर्केट
सीताराम – विष्णु घाणेकर
बाबा सणकीदास – प्रसाद धोपट
रूपा – अमिषा देसाई
मंदा – प्रीती देसाई
कांता – आकांक्षा भोईर
पत्रकार आणि इन्स्पेक्टर – अक्षय किंजळे
पत्रकार, हवालदार – सिद्धांत कांबळे
शांता – वृषाली पोळ
देवी – सिद्धी रहाटे
पत्रकार आणि तरुणी – रेश्मा मस्के
शिष्य – महेश गावणकर, अजित कांबळे, अक्षय थेराडे, दीपक गिरकर

असे होते कालचे नाटक

कुणबी कर्मचारी सेवा संघाने तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? हे नाटक गुरुवारी (दि. ८ डिसेंबर) सादर केले. ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे नाटक सचिन शितप यांनी लिहिले आहे, तर दिग्दर्शन प्रदीप रेवाळे यांनी केले आहे. कोकणात काही वर्षांपासून अनेक प्रकल्प येत आहेत. त्यात काही चांगले, तर काही विनाशकारी आहेत. या प्रकल्पांमुळे निर्माण झालेले ग्रामीण जीवनातील प्रश्न आणि त्यातून निर्माण होणारे राजकारण, समाजकारण यांचा वेध नाटकात घेण्यात आला आहे. नाटकाची कथा कोकणातील एका खेडगावात घडते. त्या गावात प्रकल्प आला आहे. अशिक्षित ग्रामस्थांना त्याचा पत्ता नाही. गावात पिढ्यान् पिढ्या आपले अस्तित्व वर्चस्व अबाधित ठेवून असलेल्या खोत मंडळींनी हुशारीने गोरगरिबांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांच्या जमिनी मातीमोल भावाने खरेदी चालविली आहे. त्यासाठी सरपंचाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठेवून शेतकऱ्यांना जमिनी विकायला भाग पाडले जाते. चेहरा सरपंचाचा असला, तरी त्याचे सूत्रधार खोतच असतात. गावात तंत्रज्ञानाचा वापर खूप कमी प्रमाणात होतो. त्यामुळे सरकारच्या अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. गावातील अनिष्ट रूढीपरंपराही गावाच्या विकासाच्या आड येतात. त्यामुळे लोकांची प्रगती होत नाही. या अनिष्ट रूढी कशा चुकीच्या आहेत, याविषयीचे प्रबोधन नाटकात करण्यात आले आहे.

संगमेश्वरी बोलीभाषेत हे नाटक असल्याने त्याचा बाज उत्तम झाला आहे. त्यामुळे नाटकाचा विषय थेट रसिकांच्या काळजात जाऊन बसतो. नाटकाच्या शेवटी नायक सुरेश घर आणि गाव सोडून जातो. प्रबोधनपर नाटकाचा शेवट असा अपेक्षित नव्हता. त्याला ग्रामस्थांकडून गावातच राहायला भाग पाडले जाते. खोत आणि सरपंचाला अटक झाल्यानंतर त्याच्यासारख्या नव्या दमाच्या आणि सुशिक्षित तरुणाची गावाला गरज आहे, हे ओळखून ग्रामस्थ त्याला राहायला भाग पाडतात, असा शेवट व्हायला हवा होता. गावातील सर्व राजकारणाला कंटाळून चाकमानी पुन्हा मुंबई गाठत असेल, तर तो निराश झाला आहे, असाच समज होईल. त्यामुळे प्रकल्पांना विरोध करून काहीही उपयोग नाही, असाच संदेश दिला जाईल. तेवढा बदल केला, तर नाटकाचा लोकप्रबोधनाचा विषय नक्कीच चांगला झाला आहे.

श्रेयनामावली

लेखक – सचिन शितप
दिग्दर्शक – प्रदीप रेवाळे
व्यवस्थापक – गोविंद तारवे सर
संगीत – योगेश बांद्रे – अविनाश गोसावी
नेपथ्य – प्रवीण धुमक
प्रकाशयोजना – नितीन बैकर
रंगभूषा – रमाकांत घाणेकर
वेशभूषा – लवू भातडे

पात्रपरिचय
सुरेश – सूर्यकांत गोताड
बाबा – दामोदर गोरिवले
तात्या – सचिन शितप
सख्या – लवू भातडे
खोत – संतोष सारंग
सरपंच – हरीश रेवाळे
इन्स्पेक्टर/नरेश – किशोर फडकले
धर्मा – प्रदीप रेवाळे
गावकरी – अनंत पातये, दिनेश निंबरे, अनंत गोताड
सुमन – श्वेताली अडसूल

…………………

तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? काही क्षणचित्रे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply