चिपळूणच्या लोककला महोत्सवास जिल्हा बँकेकडून देणगी

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने येत्या ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या लोककला महोत्सवाला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अडीच लाख रुपयांची देणगी दिली आहे.

बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि बँकेचे सरव्यवस्थापक अजय चव्हाण यांच्या हस्ते धनादेश वाचनालयाला देण्यात आला आहे.

यावेळी डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले की, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आयोजित करीत असलेल्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवासारखे कार्यक्रम होणे ही गौरवाची गोष्ट आहे. अशा कार्यक्रमांना सर्वांनीच सहकार्याचा हातभार लावायला हवा. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचनालयाला नेहमीच सहकार्य करते. म्हणून महोत्सवासाठी बँकेने अडीच लाखाची देणगी दिली आहे. महोत्सवाला तीस लाख रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. कोकणातील उद्योजकांनी यासाठी अर्थसाह्य करायला हवे, अशी भावना डॉ. चोरगे यांनी व्यक्त केली.

महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्षपद डॉ. तानाजीराव चोरगे यांनी स्वीकारले आहे. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि डॉ. चोरगे हा महोत्सव यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply