रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने सुरू केलेल्या पतसंस्था आपल्या दारी उपक्रमाला पूर्णगड येथून प्रारंभ झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
खारवी पतसंस्था गेली चार वर्षे सातत्याने आपल्या सभासद, हितचिंतक यांच्या प्रत्यक्ष भेटीकरिता, त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता आणि संस्थेच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी “पतसंस्था आपल्या दारी” प्रवास दौऱ्याचे आयोजन करत असते. यावर्षी जिल्ह्यात तालुकानिहाय आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण रत्नागिरी तालुका प्रवास दौरा काल (दि. ८ जून) पूर्णगड येथून सुरू झाला. तेथील श्री देव महापुरुष मंदिरात सभा झाली. त्याला पूर्णगड आणि गावडे आंबेरे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. दुपारी तुळसुंदे येथील विठ्ठल मंदिर, सायंकाळी पावस येथील परशुराम मंदिरात सभा झाल्या.
यापुढील दौरा असा – रत्नागिरी तालुका – रविवार, ११ जून – श्री राधाकृष्ण मंदिर, वरवडे,
सायंकाळी साडेसहा वाजता. सोमवार, १२ जून दत्त मंदिर रंगमंच, कासारवेली सायंकाळी साडेसहा वाजता. गुहागर तालुका – रविवार, ११ जून : दत्तमंदिर, पालशेत, सकाळी साडेदहा वाजता. (सभेला कुडली, काताळे नवानगर, हेदवतड, साखरी आगर, वेळणेश्वर वेळणेश्वर भाटी, कोंड-कारूळ, बुधल, पालशेत, असगोली, वेलदूर, नवानगर, तरीबंदर, धोपावे येथील समाजबांधव अपेक्षित). दापोली तालुका – सोमवार, १२ जून, गणेश मंदिर, बुरोंडी सकाळी साडेदहा वाजता, (सभेला बुरोंडी, लखडतरवाडी आणि दापोलीतील समाजबांधव अपेक्षित), साई मंदिर, ढोरसई, दाभोळ, दुपारी ३ वाजता, (सभेला दाभोळ, ओणी, भाटी, दाभोळ येथील समाजबांधव अपेक्षित).
या प्रवास दौऱ्यात सर्व संचालक मंडळ सदस्य, प्रशासन आणि समन्वय समिती सदस्य सहभागी होणार आहेत. पतसंस्था आपल्या दारी या प्रवास दौऱ्यात नियोजित सभास्थानी उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष सुधीर वासावे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे आणि अन्य संचालकांनी केले आहे.