रत्नागिरीत २२, तर सिंधुदुर्गात २६ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ ऑक्टोबर) २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४०५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २६ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४७८५ झाली आहे.

Continue reading

दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी शाळेचे गुरुवर्य मा. न. जोशी स्कूल असे नामकरण

रत्नागिरी : फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी, शिक्षक, उपमुख्याध्यापक आणि निवृत्तीनंतरही गुरुवर्य एमएन तथा माधव नरहर जोशी यांनी शाळेसाठी आयुष्यभर योगदान केले. गुरुवर्य फाटक यांनी राष्ट्रीय शिक्षणासाठी सुरू केलेले फाटक हायस्कूल शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे. आता संस्थेने भारतीय संस्कृतीच्या विचारावर आधारित इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली असून, गुरुवर्य जोशी या योग्य व्यक्तीचे नाव शाळेला दिल्याचा विशेष आनंद वाटतो, असे प्रतिपादन दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबा परुळेकर यांनी केले.

Continue reading

मराठी कवी, लेखक संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सुनील जाधव

मराठी कवी व लेखकांच्या उत्कर्षासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या मराठी कवी व लेखक संघटनेची रत्नागिरी जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

Continue reading

रत्नागिरीत ८, तर सिंधुदुर्गात ३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ ऑक्टोबर) आठ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८३८३ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तीन नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४७५९ झाली आहे.

Continue reading

1 2 3 127