व्हॉट्सअॅपवरच्या एका मेसेजवर धामापूर तर्फ संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील २२ अपंगांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरीतून पाठविण्यात आली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
व्हॉट्सअॅपवरच्या एका मेसेजवर धामापूर तर्फ संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील २२ अपंगांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरीतून पाठविण्यात आली.
करोनाच्या प्रतिबंधाकरिता संचारबंदी सुरू असल्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकरिता रत्नागिरीत हेल्पिंग हँड्स ही स्वयंसेवी संस्थांची साखळी प्रशासनाला मदत करत आहे; पण त्याही पलीकडे जाऊन याच साखळीच्या सदस्यांनी अत्यावश्यक सेवेतील एका सेवकाला दुचाकीचे पंक्चर काढून देऊन वेगळ्याच पद्धतीने मदतीचा हात दिला.
नागरिकांना करोनाच्या संदर्भातील सर्व प्रकारच्या सरकारी उपाययोजनांची अधिकृत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पुढाकार घेतला आहे. महासंचालनालयाने https://www.mahainfocorona.in या वेबसाइटची निर्मिती केली आहे. येथे मराठीत सर्व माहिती उपलब्ध आहे.
करोना संसर्गाच्या संकटामुळे लॉकडाउन लागू झाले. त्यामुळे, अत्यावश्यक सेवेत नसलेल्या आणि वर्क फ्रॉम होम करू शकत नसलेल्या नागरिकांना हाताशी बराच मोकळा वेळ उपलब्ध झाला. अचानक
करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्यात रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय, विद्यापीठे, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलची उभारणी केली जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेने पुढाकार घेऊन कमी खर्चात सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे. काही राज्यांत त्याचा वापर आधीच सुरू झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
पुण्यात कार्यरत असलेल्या आणि मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या शौनक माईणकर या तरुण प्राध्यापकाने लॉकडाउनच्या काळात शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्टॉक टॉक असे या कोर्सचे नाव. शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करू इच्छिणारी कोणीही व्यक्ती या कोर्समध्ये सहभागी होऊ शकते.