महापुराच्या आपत्तीतील तारणहार हेल्पिंग हॅण्ड्स करोना महामारीतही कार्यरत

रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) येथील धरणफुटीच्या वेळी मदत करणारे रत्नागिरीतील हेल्पिंग हॅण्ड्स करोना महामारीच्या वेळीही कार्यरत झाले आहेत. रत्नागिरी शहर आणि परिसरातील सुमारे दीड हजार कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मोफत वाहतूक करून हेल्पिंग हॅण्ड्सची साखळी आणखी मजबूत होत असतानाच समाजकार्याचा वेगळा मानदंड तयार करत आहे.

Continue reading

एका दिवसात वीजपुरवठा करून महावितरणने उजळविले निराधार वृद्धेचे आयुष्य

रत्नागिरी : करोनाच्या लढ्यात जनतेला घरी थांबायला सांगण्यात आले आहे. त्याकरिता आवश्यक त्या सुविधा पुरवायला प्रशासन सज्ज आहे. प्रशासनाचाच एक भाग असलेली आणि अखंड वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेली महावितरण कंपनी किती सज्ज आहे, याची चुणूक कंपनीने दाखवून दिली आहे. एका निराधार वृद्धेला एका दिवसात वीजपुरवठा करून महावितरण कंपनीने आपली सज्जता सिद्ध केली आहे.

Continue reading

स्मरण द्रष्ट्या राष्ट्रपुरुषाचे

आज भारताचे नाव जगात आदराने घेत जात असेल, तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नक्कीच राष्ट्रनिर्माणाचे होते, हे मान्य करावेच लागेल. १४ एप्रिल या त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचे स्मरण.

Continue reading

पीएम केअर्स निधी विरुद्ध मुख्यमंत्री निधी; राजकारण पेटवणाऱ्यांकडून केवळ दिशाभूल

मुंबई : ‘केवळ पीएम केअर्स निधीला दिलेली मदतच ‘सीएसआर’अंतर्गत ग्राह्य धरली जाणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीला दिलेली मदत त्याअंतर्गत गृहीत धरली जाणार नाही. करोना संसर्गाच्या सध्याच्या परिस्थितीतही राजकारण करण्याचा केंद्र सरकारचा हेतू असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे,’ अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र यूपीए सरकारने कायद्यात केलेली सुधारणा यासाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण पेटवू पाहणारे विरोधक तोंडावर पडले आहेत.

Continue reading

साप्ताहिक कोकण मीडिया – १० एप्रिलचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १० एप्रिल २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत

Continue reading

1 315 316 317 318 319 328