एक मे 2020च्या अंकाचे संपादकीय…

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
एक मे 2020च्या अंकाचे संपादकीय…
रत्नागिरी : आजवर मुंबईकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर कोकणातील चुली पेटत होत्या. मात्र करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या चाकरमान्यांच्या मुंबईतील चुली पेटण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातच धान्य गोळा केले आणि ते चाकरमान्यांना मुंबईत घरपोच दिलेही.
राजकारणी लोक आणि प्रशासनाला आपली लोकप्रियता निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी विविध माध्यमांचा चांगला उपयोग होत असतो. त्यासाठीच ही माध्यमे वापरून घेतली जातात. पण करोनाच्या संकटकाळीही त्यांच्या आरोग्याची, आयुष्याची जबाबदारी घेण्याच्या बाबतीत कोणीही पुढाकार घेतलेला नाही. कोणत्याही सामाजिक संस्थांनीही त्याबाबत स्वारस्य दाखविलेले नाही. अर्थातच कुणी आपल्या संरक्षणासाठी पुढे येईल, अशी पत्रकारांचीही अपेक्षा नाही. कारण लोकशाहीचा हा चौथा स्तंभ निरपेक्ष पद्धतीनेच काम करत आहे आणि काम करत राहणार आहे. तूर्त तरी पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावरच आहे.
जे प्रतिनिधी सोशल डिस्टन्सिंगबाबत वारंवार लोकांचे प्रबोधन करत आहेत, ते स्वतः मात्र हे सामाजिक अंतर राखताना दिसत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ठिकाणी, तसेच पालकमंत्री या नात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने आढावा बैठका घेत आहेत. आधुनिक संपर्क यंत्रणेच्या काळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशा बैठका घेणे सहज शक्य असताना ते स्वतः दोन्ही जिल्ह्यांचा प्रवास नियमितपणे करत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना जेव्हा कारवाईचा इशारा दिला जातो, तेव्हा दोन जिल्हे सातत्याने फिरणाऱ्या मंत्र्यांचे वागणे योग्य म्हणता येणार नाही.
दापोली : जुन्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून दापोली नगर पंचायतीने शून्य खर्चात तयार केलेल्या स्वयंचलित निर्जंतुकीकरण कक्षाचे उद्घाटन आज (ता. १३ एप्रिल) झाले. करोना प्रतिबंधाचा उपाय म्हणून नगर पंचायत कार्यालयात या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे पंचवीस हजार रुपयांची बचत झाली आहे.
संपूर्ण जग व्यापून टाकणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात आणि अगदी ग्रामीण पातळीवरही प्रत्येक जण आपापल्या परीने हे प्रयत्न