१० रुपयांत आरोग्य तपासणी, मोफत जेनेरिक औषधे; नाचणे गावातील युवकांचा उपक्रम

करोनाच्या कालावधीत सुदृढ आरोग्याचे महत्त्व प्रत्येकाला कळले. तसेच आरोग्य यंत्रणेच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी शहराजवळच्या नाचणे गावातील काही तरुणांनी सर्वसामान्य, गरजू नागरिकांसाठी केवळ १० रुपयांत आरोग्य तपासणीचा उपक्रम ‘आपली माणसं’ या नावाने सुरू केला आहे.

Continue reading

डॉ. जगन्नाथ दीक्षित जीवनशैलीची ठाण्यात विनामूल्य सल्ला केंद्रे

ठाणे: ‘दीक्षित डाएट’ हा जीवनशैली बदलण्याचा मार्ग आहे, आपल्याला निरोगी, मधुमेहमुक्त आयुष्य जगायचे असेल आणि वजन कमी करायचे असेल, तर जीवनशैली बदलणे गरजेचे आहे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ आणि ‘दीक्षित डाएट’चे प्रणेते आडोर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी ठाणेकरांना आज (३१ जानेवारी) दिला.

Continue reading

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील अनेक त्रुटींवर मंत्र्यांच्या भेटीने प्रकाश

रत्नागिरी : रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (रविवारी) अचानक दिलेल्या भेटीत रुग्णालयातील अनेक त्रुटींवर प्रकाश पडला. विविध विभागांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे आढळून आले.

Continue reading

रत्नागिरीच्या इन्फिगोमध्ये आज आणि उद्या विशेष नेत्रतपासणी

रत्नागिरी : मुंबईतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये आजपासून (२८ डिसेंबर) येत्या ३१ डिसेंबरपर्यंत विशेष नेत्रतपासणी होणार आहे. या कालावधीत तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असून ते विशेषतः मधुमेही रुग्णांची तपासणी करणार आहेत.

Continue reading

एकत्रित वैद्यकीय सुविधेसाठी इन्फिगोने पुढाकार घ्यावा : उदय सामंत

रत्नागिरी : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमुळे डोळ्यांच्या उपचारांसंदर्भातील कोकणातील उणीव दूर झाली आहे. आता यापुढे जाऊन इन्फिगोने पुढाकार घेऊन इतर वैद्यकीय विशेषज्ञांच्या समन्वयातून सर्वसामान्यांसाठी एकत्रितरीत्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

Continue reading

करोनाचा धडा : प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मूलभूत गोष्टी अंगीकारू या!

गेले सुमारे आठ-नऊ महिने आपण सतत ‘करोना’ महामारीच्या दडपणाखाली वावरत आहोत. या महामारीची तीव्रता आता कमी होत असली, तरी अद्याप तिचा पूर्ण बीमोड झालेला नाही. ‘आयुर्वेद’ आणि ‘योग’ या आपल्या अस्सल भारतीय चिकित्सा पद्धती सोडल्या, तर अन्य सर्व चिकित्सा पद्धतींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दृष्टीने यापुढील काळात भविष्यकाळातील संभाव्य महामारींचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने घ्याव्या लागणाऱ्या जबाबदारीबाबत काही सुचविण्याचा हा एक प्रयत्न.

Continue reading

1 2 3 7