रत्नागिरी : डोळे चांगले राहण्यासाठी मुलांनी चांगला आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच चिंचा, बोरे, आवळे खाल्ले पाहिजेत, अशी सूचना प्रसिद्ध बाल नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप देशपांडे यांनी केली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : डोळे चांगले राहण्यासाठी मुलांनी चांगला आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच चिंचा, बोरे, आवळे खाल्ले पाहिजेत, अशी सूचना प्रसिद्ध बाल नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप देशपांडे यांनी केली.
रत्नागिरी : येथील श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था, वैश्य युवा आणि इन्फिगो आय केयर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. श्री राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होईल.
रत्नागिरी : करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचे अस्त्र असलेल्या प्लाझ्मा थेरपीचे केंद्र आता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू झाले आहे. प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचा ऑनलाइन उद्घाटन सोहळा १८ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्हा रुग्णालयात अशी व्यवस्था उपलब्ध झालेला रत्नागिरी हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
रत्नागिरी : इन्फिगो आय केअर या रत्नागिरीतील डोळ्यांच्या हॉस्पिटलतर्फे नाचणे गावातील बचत गटातील महिलांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.
रत्नागिरी : रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या इन्फिगो आय केअरमध्ये आजपासून (दि. ८ ऑक्टोबर) मोतिबिंदू तपासणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात मोतिबिंदूची तपासणी मोफत केली जाणार आहे. इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी ही माहिती दिली. मोतिबिंदू तपासणी सप्ताहात मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत.
रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअरमध्ये काल (ता. २९) रेटिनाची गुंतागुंत असलेल्या दहा रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. हॉस्पिटलमध्ये रेटिनाची तपासणी आजही (ता. ३०) होणार असून त्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.