मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या वर्धापनदिनी बालसाहित्याच्या पाच विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या विलेपार्ले शाखेच्या वर्धापनदिनी बालसाहित्याच्या पाच विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील “द लँड ऑफ लेक” (तलावांची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर ‘लवेबल लांजा’ म्हणून आपली नवी ओळख करू पाहतो आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने अशा लांजा तालुक्याची ओळख.
लांजा : झाशीच्या राणीचे सासर असलेल्या कोट (ता. लांजा) गावात माचपठार कातळसड्यावर विपुल प्रमाणात कोरीव आणि देखण्या कातळशिल्पांचा समूह प्रकाशात आला आहे.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यंदा सुरू आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज (२५ नोव्हेंबर) स्मृतिदिन. त्यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसाच्या आठवणीबद्दलच्या लेखाचा संपादित अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘सतत वाचन, आनंदी-सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर मांडण्याचे ईश्वरी कार्य केले. आयुष्यभर प्रवास करून दिलेल्या व्याख्यानांतून मिळालेला पैसा बाबासाहेबांनी शिवप्रतिष्ठानकडे सुपूर्द केला. पुण्यातील आंबेगाव येथे २१ एकर जमिनीवर भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी, हे बाबासाहेबांनी आयुष्यभर उराशी बाळगलेले एक स्वप्न आहे. शिवचरित्र समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य तुमचे-आमचे सर्वांचे आहे. या कार्यातूनच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली वाहू या,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ विलास पाटणे यांनी केले.
कल्याण (जि. ठाणे) : कोकण इतिहास परिषदेचे अकरावे एकदिवसीय राष्ट्रीय आधिवेशन गेल्या महिन्यात येथे पार पडले. अधिवेशनात ६० पेक्षा अधिक शोधनिबंध सादर झाले, हे विशेष.