पालघर : स्पर्धा परीक्षांविषयीचा न्यूनगंड बाजूला ठेवला, तर त्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे असते, असे आश्वासक विचार परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी व्यक्त केले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पालघर : स्पर्धा परीक्षांविषयीचा न्यूनगंड बाजूला ठेवला, तर त्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे असते, असे आश्वासक विचार परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्याबाबत व्हावे आणि महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना सावंतवाडी थांबा मिळावा, अशा आशयाचे निवेदन रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष मिहिर मिलिंद मठकर यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांना दिले.
सावंतवाडी : सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील कोकण रेल्वेच्या टर्मिनसचे काम पूर्ण झाले नाही, तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सावंतवाडी स्थानकप्रमुखांना दिला.
वसई : कोकण रेल्वेमार्गावर वसई सावंतवाडी पॅसेंजर सुरू करावी, अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमच्या मागणीची रेल्वे बोर्डाकडे शिफारस करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.
मुंबई : येथे पार पडलेल्या रेल्वे महाचर्चेत वसई सावंतवाडी प्रवासी संघटनेने वसई सावंतवाडी पॅसेंजर गाडीच्या आपल्या जुन्या मागणीचा आग्रह धरला.
वसई : अनेक वर्षांपासून मागणी होत असलेली वसई ते सावंतवाडी पॅसेंजर गाडी कोकण रेल्वेमार्गावर लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.