करोना लॉकडाऊनमध्ये ‘या’ कुटुंबाने विहीर खोदून पाणीप्रश्न सोडवला

राजापूर : करोनातील लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करीत राजापूरमधील बंगलवाडीतील जाधव कुटुंबीयांनी श्रमदानातून ५६ फूट खोल विहीर खोदून पाण्याचा प्रश्न मिटविला आहे. करोना आपत्तीकडे संकट म्हणून पाहिले जात असताना जाधव कुटुंबीयांनी त्या संकटाला संधी म्हणून पाहत स्वयंप्रेरणेतून महिनाभर राबून विहीर खोदली. त्यांनी कष्टपूर्वक पाणीटंचाईवर केलेली मात इतरांसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल.

वाचन चालू ठेवा

करोना रुग्णसंख्या : रत्नागिरी ३३४, सिंधुदुर्ग ९७

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (चार जून) आणखी १३ नव्या करोनाबाधितांची भर पडल्याने आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या ३३४ झाली आहे. काल (तीन जून) एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनाला बळी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात काल सहा आणि आज दोन नव्या रुग्णांची भर पडल्याने तेथील रुग्णांचा आकडा ९७ झाला आहे.

चक्रीवादळ अखेर मंदावले; अचूक अंदाज, योग्य नियोजनामुळे जीवितहानी टळली

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी/अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या किनाऱ्यावर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने धडकलेले निसर्ग चक्रीवादळ अखेर मंदावले आहे. या वादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मालमत्तेचे

चक्रीवादळ अलिबागजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू; वाऱ्यांचा वेग १०० किमीहून अधिक

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाने तीन जूनला दुपारी एक वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची (लँडफॉल) प्रक्रिया दुपारी साडेबारापासून सुरू झाली आहे. पुढील तीन तासांत ती प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या चक्रीवादळाच्या व्यासाचे ईशान्येकडील टोक जमिनीवर पोहोचले आहे.

चक्रीवादळाची नऊ वाजताची स्थिती… रत्नागिरीत ताशी ५५ किमी वेगाने वारे

तीन जून २०२० – भारतीय हवामान विभागाने सकाळी नऊ वाजता प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार निसर्ग चक्रीवादळाची स्थिती…

करोना रुग्णसंख्येत दिवसभरात रत्नागिरीत २०, तर सिंधुदुर्गात १३ने वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दोन जून) सकाळी आणि सायंकाळी मिरज येथील प्रयोगशाळेकडून आलेल्या करोनाविषयक अहवालांनुसार जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या २०ने वाढली आहे. सकाळच्या अहवालात १०, तर सायंकाळच्या अहवालात १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. एकूण बाधितांची संख्या ३०७ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (दोन जून) दिवसभरात करोना रुग्णांच्या संख्येत १३ने वाढ झाली. त्यामुळे तेथील बाधितांची एकूण संख्या ८५ झाली आहे.

1 30 31 32 33 34 50