रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सहा जून) एकाही नव्या करोनाबाधिताची नोंद झाली नाही. बरे झालेल्या ३० बाधितांना आज घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील सर्वाधिक २३ करोनाबाधित गावे (कन्टेन्मेंट झोन) संगमेश्वर तालुक्यात आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या ११६ झाली असून, आतापर्यंत १७ जणांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
