मुंबई : कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेने २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मुंबईत जलरंगातील निसर्गचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेने २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मुंबईत जलरंगातील निसर्गचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, २० फेब्रुवारी रोजी त्यांना विनम्र अभिवादन केले. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि वारसा प्रय़त्नपूर्वक जतन करू या’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक `दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले आहे. त्यानुसार येत्या शनिवारी (२० फेब्रुवारी) बाळशास्त्री जांभेकर यांच्या २०९ व्या जयंतीदिनी शासकीय कार्यालयांमध्ये बाळशास्त्रींना अभिवादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तळेरे (ता. कणकवली) : हस्ताक्षरांचा छंद जोपासणारे तळेरे (ता. कणकवली) येथील निकेत पावसकर यांच्या संग्रहातील हस्ताक्षरे आणि संदेशपत्रांचे प्रदर्शन शनिवारी, १३ फेब्रुवारी) मुंबईत दादर येथे होणार आहे.
मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा २२ मार्च २०२०पासून बंद होती. त्यानंतर गेले काही महिने ही सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरू होती; मात्र येत्या एक फेब्रुवारी २०२१पासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल) सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुंबई : ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी आज (२१ डिसेंबर) बैठक घेतली. राज्यात उद्यापासून (२२ डिसेंबर) महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाच जानेवारी २०२१पर्यंत अशी संचारबंदी लागू राहील.