तौते चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात

रत्नागिरी : अरबी समुद्रात सुरू झालेले तोक्ती चक्रीवादळ रविवारी, १६ मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या जवळून समुद्रातून गुजरातच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून वादळाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्नारायण मिश्रा यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

Continue reading

होमिओपॅथीचे प्रचारक अशोक प्रभू यांचे निधन

वालावल (ता. कुडाळ) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होमिओपॅथीचे प्रचारक आणि येथील रहिवासी अशोक प्रभू (वय ६७) यांचे काल (दि. १३) सायंकाळी कोल्हापूर येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना करोनाची बाधा झाली होती.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ४८१ रुग्ण, ८२४ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१३ मे) करोनाचे नवे ४८१ रुग्ण आढळले. त्यामध्ये कालच्या रॅपिड अँटिजेन टेस्टने निष्पन्न झालेल्या १९१ जणांचा समावेश आहे. आज ८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

Continue reading

रत्नागिरीत करोना चाचणी पथक आपल्या दारी उपक्रम

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून शहरात फिरते करोना चाचणी पथक सज्ज करण्यात आले आहे. दररोज शहराच्या विविध भागात हे पथक चाचण्या करणार आहे.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ४२१ रुग्ण, ४१० करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ मे) करोनाचे नवे ४२१ रुग्ण आढळले, तर ४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

Continue reading

1 252 253 254 255 256 409