रत्नागिरी : खल्वायन या संस्थेची सलग २६९वी मासिक संगीत सभा शनिवारी, १४ मार्च २०२० रोजी होणार आहे. त्यात गोव्याच्या प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा गावकर यांच्या शास्त्रीय, तसेच अभंग, नाट्यगीत गायनाची मैफल रंगणार आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : खल्वायन या संस्थेची सलग २६९वी मासिक संगीत सभा शनिवारी, १४ मार्च २०२० रोजी होणार आहे. त्यात गोव्याच्या प्रसिद्ध युवा गायिका मुग्धा गावकर यांच्या शास्त्रीय, तसेच अभंग, नाट्यगीत गायनाची मैफल रंगणार आहे.
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील आडिवरे-नवेदरवाडीतील नांदगावकर सुतार बंधू यांची सालाबादप्रमाणे होणारी श्री सत्यनारायण महापूजा यंदा ११ मार्च २०२० रोजी झाली. यंदा पूजेचे ६४वे वर्ष होते. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक कारागीरांनी बनविलेल्या वैविध्यपूर्ण आणि उपयुक्त अशा लाकडी वस्तूंचे प्रदर्शन हा सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू ठरला.
‘डेरा’ हा लोककला प्रकार रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील मंडणगड तालुक्यात आढळतो. शिमग्याच्या दिवसांत मंडणगडजवळील पाट या गावातील गवळी समाजाचे लोक हे सादर करतात. हे लोक शिमग्यात घरोघर फिरतात. अन्यत्र कोठे हा प्रकार आढळत नाही. त्या लोककलेची माहिती देणारा हा लेख…
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा हजार वर्षांपूर्वीच्या कातळशिल्पांचा शोध लागला असून दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडत आहे. कुरतडे (ता. रत्नागिरी) येथेही कातळामध्ये खोदलेल्या काही चित्रकृती निदर्शनाला आल्या असून, त्याबाबत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे उद्योगिनी, महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन रत्नागिरीत साई मंगल कार्यालयात भरवण्यात आले असून, ते आठ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या रत्नागिरी शाखेची सन २०२०-२१साठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी सीए बिपीन शहा यांची निवड करण्यात आली.