शिवरायांची राजधानी असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव १५० वर्षांनंतर काठोकाठ भरला आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तलावाला १८ जुलै २०२० रोजी भेट देऊन तलावातील पाण्याचे पूजन केले आणि ओंजळीने तलावाचे पाणी पिऊन तृप्तता अनुभवली.
